Welcome Comments for Myspace

लोगो कसा बनवावा ?



◆ प्रथम Play store मधून Pics Art app घ्या . किंवा खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करून घ्या.


●App open करा.
खाली + टच करा.
खाली draw सिलेक्ट करा.

● Blank निवडा
Template मधून size निवडा.
उदा.-2048 × 2048
सिलेक्ट केलेले width व Height येथे दिसते .
मग orientation निवडा उभे की आडवे
मग ok करा.

● आता blank page दिसेल
खाली 6 नं ला दिलेल्या आकृतीला सिलेक्ट करा.
आता समोरील आकृती मधील गोल निवडा व size कमी जास्त करून घ्या.
आता stroke सिलेक्ट करा व ok करा.

● आता परत आपले blank page दिसेल
आता गोल draw करा size हवी तेवढी ठेवा.

● परत अजून एक गोल त्याच  गोलात  काढा.
आता परत खाली 6 नं चे  निवडा
गोल निवडा व खाली fill निवडा ok करा.

● आता खालील 1 नं वरील रंगीत चौकोन निवडा यातील हवा तो रंग सिलेक्ट करा व ✅ या वर टिक करा.

●आता परत आपण गोल काढला ते पान दिसेल त्याच्या आत  परत गोल काढा
तुम्ही जो रंग निवडला त्याच रंगाचा गोल येथे दिसेल.
आता वरती Done करा
मग तुम्हाला खाली 2 option येतील त्यातील Edit Image सिलेक्ट करा.

●आता आपला तयार गोल व खाली नवीन option दिसतील(tools)
  खालील 4 नं मधील add फोटो टच करा
आता फोटो निवडा व वरती Add ला टच करा.

● आता तुम्हाला तुम्ही निवडलेला फोटो दिसेल.
आता खालील 5 नं चे Shape select करा.
आता खाली विविध आकार दिसतील
यातील गोल निवडा व फोटो जवळील बाणाने गोलाची size हवी तेवढी करून घ्या.

● खाली size हा option आहे व शेजारी colour बॉक्स आहे त्याप्रमाणे size व रंग निवडा.
मग वरती उजवीकडे कोपऱ्यात➡आहे तो टच करा आता गोलात फोटो दिसेल
आता उजवीकडे कोपऱ्यातील  ✅ टच करा.

● आपण तयार केलेल्या पहिल्या रंगीत गोलात निवडलेला फोटो गोलात दिसतो
आता हा फोटो size कमी जास्त करून बरोबर गोलाच्या मध्यभागी ठेवा.
(जर हा फोटो नको असेल तर फोटोवर डावीकडे वरती ❌ हे चिन्ह गोलात दिसते ते टच केले की फोटो कट होतो)
आता फोटो गोलात मध्यभागी adjust केल्यावर वरती उजवीकडे ✅टच करा.

●आता बघा - पहिल्या रंगीत गोलात आपण सिलेक्ट केलेला फोटो मध्यभागी दिसतो.
आता खालील 9 नं चे (T) Text निवड व type करा व वरील उजवीकडील ✅ टच करा
तुम्ही type केले फोटोच्या वर किंवा खाली घ्यायचे ते ठरवा.

●मग खालील फॉन्ट निवडा व colour निवडा.
आता खालील शेवटी असलेले Bend निवडा.
Bend डावीकडे वा उजवीकडे adjest करा.
आता परत वरती + मधील text घ्या व परत हीच कृती करा.
आता यातील sticker निवडा व रंगीत गोलावर adjest करा (त्याची size लहान मोठी करता येते व रंग ही बदलता येतो)

●आता आपला लोगो तयार
 वरील उजवीकडील ✅ ok करा
आता काही बदल करायचा ते पहा व त्याप्रमाणे बदल करा.
नसेल तर वरील उजवी कडील ✅ ok करा.
आता तयार लोगो व त्याखाली पर्याय दिसतील.
त्यातील gallery निवडा
तुमचा तयार लोगो gallery मध्ये save होतो.

No comments:

Post a Comment

जुना धामणगाव केंद्राच्या शैक्षणिक ब्लॉग चे अनावरण.

Blogger Widgets Blogspot Tutorial

Math Game