Welcome Comments for Myspace

Sunday, March 22, 2020

What's App वरील मेसेज कसे जतन करावे

 What's App वरील मेसेज कसे जतन करावे

मित्रांनो
व्हाट्सअॅप वर खुप महत्वाचे मँसेज येत असतात . एवढे सर्व मँसेज कुठे सेव्ह करावे हा तुम्हाला  नेहमीच पडणारा प्रश्न आहे. आज त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे.
WPS Office नावाचे अतिशय सुंदर अॅप गुगल प्ले- स्टोर वर आहे. ते डाउनलोड करा.
यात
*Pdf

*word

*Excel

*power point

सर्व फॉर्मट सपोर्ट होतात

                  पध्दत
  ●  तुम्हाला जो मँसेज जतन करुन ठेवायचा आहे त्या मँसेजवर काही क्षण बोट दाबुन धरा मँसेज फिक्कट निळा होइल व तुमच्या मोबाईल स्क्रिनच्या वरील बाजुस उजव्या कोपऱ्यात छोटा आयत दिसेल. त्या आयताला स्पर्श करा. आता तुमचा मँसेज कॉपी होईल.

● WPS OFFICE   हे अँप ओपन करा. केल्यावर तुम्हाला
➕ असे चिन्ह दिसेल
या चिन्हावर क्लीक केल्यावर तुम्हाला खालील चार पर्याय दिसतील
1) new spreadsheet

2) new presentation

3) new memo

4) new documents

वरील चार पर्यायांपैकी
4) new documents वर क्लीक करा तुम्हाला Blank व custom templates  हे दोन पेज दिसतील
Blank वर क्लीक करा.
               ↓
word format चे पेज ओपन होइल.      
               ↓
या पेजवर जावुन काही क्षण पेजवर बोट दाबुन धरा.
                ↓
तुम्हाला select = select all = paste
हे तीन पर्याय दिसतील.
पैकी  paste  हा पर्याय निवडी व paste ला क्लीक करा.

तुमचा मँसेज कॉपी झाला.
                 ↓
याच स्क्रिनवर खालच्या भागात मधोमध tool हे अॉप्शन आहे. त्यावर क्लीक करा.
                  ↓
तुम्हाला save as असे अॉप्शन दिसेल त्यावर क्लीक  करा.
                  ↓
आता तुम्हाला
*phone

*SD card

*my documents

असे तीन पर्याय दिसतील
शक्यतो SD card (memory card)  हाच पर्याय निवडा.
Memory Card नसेल तर phone ( phone memory)
हा पर्याय निवडा.
                    ↓
तुमच्या फाइलला मनपसंत नाव द्या.  तुमची माहिती कायमस्वरुपी सेव झाली.
तुमच्या माहितीचे ई-पुस्तक तयार झाले.

आता पुन्हा याच ई-पुस्तकात नवीन मँसेज सेव करायचा असेल तरपुन्हा सांगितल्यानुसार  कॉपी करा.
                  ↓
   तुमच्या मोबाईलच्या
file browser  मध्ये जाउन तुम्ही सेव केलेली फाइल शोधा
                 ↓
क्लीक करुन else office  मध्ये ओपन करा.
                 ↓
ई-पुस्तक ओपन होइल.
                 ↓
याच स्क्रिनवर खालच्या उजव्या बाजुस keyboard हा टँब दिसेल.  त्यावर क्लीक करा.
                  ↓
Mobile keyboard ओपन होइल.
                  ↓
Keyboard वरील enter चे बटन दाबुन  स्क्रिनवरील कर्सर   खाली आणा.
                   ↓
वर सांगितल्यानुसार पुढील सर्व कृती करा.
                   ↓
अशा रीतीने तुम्ही दररोजचे महत्वपूर्ण मँसेज कायमस्वरुपी सेव करु शकता.
                   ↓
डेटा केबल किंवा ओटीजी केबल द्वारे ही फाईल कम्प्युटर वर कायमस्वरूपी सेव ठेवु शकता
तेही अतीशय कमी जागेत
mb मध्ये नाही kb मध्ये.

No comments:

Post a Comment

जुना धामणगाव केंद्राच्या शैक्षणिक ब्लॉग चे अनावरण.

Blogger Widgets Blogspot Tutorial

Math Game