Welcome Comments for Myspace

Tuesday, April 28, 2020

How to Screen Shot on Laptop

 Screen Shot कसा घ्यावा 


How to Screen Shot on Laptop

 स्क्रीन शॉट घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत.

 त्यासाठी काही कीबोर्ड शॉर्टकटस् वापरले जातात. तुमच्या संपूर्ण कॉम्प्युटर स्क्रीनचा स्क्रीन शॉट घ्यायचा असल्यास की बोर्डवरील ‘प्रिंट स्क्रीन’ ही की दाबावी. त्यानंतर minimize karun‘पेंट’ APP ओपन करून त्यामध्ये ‘पेस्ट’ करावे. म्हणजे पूर्ण स्क्रीन इमेज पेंटमध्ये पेस्ट होईल. त्यानंतर (SAVE AS JPG) त्याला ईमेज म्हणून ‘सेव्ह’ करावं.

तुम्हाला फक्त स्क्रीनवरील अँक्टिव्ह विंडो किंवा डायलॉग बॉक्स कॉपी करायचा असल्यास ‘अल्टर प्लस प्रिंट स्क्रीन‘ दाबून पेंटमध्ये पेस्ट करावं. स्क्रीन शॉट पेस्ट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड, गुगल डॉक्स, पेंट किंवा फोटो शॉप यापैकी काहीही वापरू शकता.

स्क्रीन शॉट अँप्स...........

की बोर्ड शॉर्टकटऐवजी तुम्ही काही अँप्ससुद्धा कॉम्प्युटर स्क्रीन शॉट घेण्यासाठी वापरू शकता.

स्निपिंग टूल्स, जिंग, स्नॅगइट किंवा स्कीच.

त्याचप्रमाणे तुम्हाला जर स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं असेल तर त्यासाठी जिंग, अँक्टिव्ह प्रझेंटर (विंडोज) वापरू शकता.

अँण्ड्रॉईड  चा स्क्रीन शॉट

अँण्ड्रॉईड डिव्हाईसेसचा स्क्रीन शॉट घेण्यासाठी तुम्हाला *व्हॉल्युम डाऊन*आणि *पॉवर* हे *दोन्ही बटण*एकाच वेळी दाबावे लागतील. यावेळी फोटो काढल्यासारखा क्लिक असा आवाज होतो आणि तुमच्या स्मार्टफोन स्क्रीनचा फोटो घेतला जातो.

स्क्रीनशॉट घेतला की तो  फोटो गॅलरीमध्ये किंवा फोटो अँपमध्ये सेव्ह होतो.

जर तुमच्या स्मार्ट फोनमध्ये लेटेस्ट अँण्ड्रॉईड ओएस असेल तर त्यामध्ये स्क्रीन शॉट घेण्यासाठी तुम्ही फक्त पॉवर बटण एक-दोन सेकंदांसाठी दाबून ठेवल्यास एक नवीन मेनू स्क्रीनवर येतो आणि त्यामध्ये स्क्रीन शॉट हे ऑप्शन सिलेक्ट केलं जातं.

No comments:

Post a Comment

जुना धामणगाव केंद्राच्या शैक्षणिक ब्लॉग चे अनावरण.

Blogger Widgets Blogspot Tutorial

Math Game